हे समजावणे की ‘पुरुषी’ समजावणे? ‘मॅन्सप्लेनिंग’चा धांडोळा
तुम्ही पुरुष असाल आणि अशा टवाळीत सामील असाल, तर वेळीच सावध व्हायची गरज आहे. मॅन्सप्लेनिंग सातत्याने घडत असते. त्याला स्थळ-काळ-वेळ-वय यापैकी कशाचेही बंधन नाही. एखादा पुरुष कोण आहे, त्याची सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक कुवत काय आहे. तो एखाद्या विषयातील तज्ज्ञ आहे की नाही, तो वयाने लहान आहे की मोठा, हे प्रश्न इथे पडत नाहीत. तो एक ‘पुरुष’ आहे एवढे पुरेसे असते. अशा वागण्याचा एकप्रकारचा पॅटर्न बनतो आणि तो अविरतपणे सुरू राहतो.......